
एका फोन कॉलमुळे ६९ वर्षीय महिलेची आयुष्यभराची कमाई सायबर भामट्यांनी लुटली आहे. नेमका कुठे आणि कसा घडलाय हा धक्कादायक प्रकार? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी शहरातील टीव्ही सेंटर परिसरात राहणाऱ्या या महिलेला अनोळखी व्यक्तीने फोन केला. आपण कुलाबा पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचं सांगत, दहशतवाद्यांशी संबंधित खात्यांमध्ये तुमचे पैसे गेल्याचा आरोप करण्यात आला. तसंच, तुमच्या नावाने अटक वॉरंट असल्याची धमकी देण्यात आली.
कारवाईच्या भीतीने महिलेने आधी २२ लाख रुपये पाठवले. त्यानंतर पुन्हा पैशांची मागणी झाली. एफडी मोडून पैसे दिल्यानंतरही भामट्यांनी पाठ सोडली नाही. अखेर सोन्याचे दागिने विकूनही पैसे पाठवण्यात आले. अशा प्रकारे एकूण ३७ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाली.
या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्षात ठेवा, डिजिटल अरेस्ट हा कायदेशीर अटकेचा प्रकार नाही. फोनवर धमकी देऊन कोणी पैसे मागितले, तर पैसे पाठवू नका. तुम्हालाही असा फोन आला आहे का? कमेंट करून सांगा.





