
अहिल्यानगर जिल्ह्यातुन एक चिंताजनक बातमी समोर आलीये. जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण योजनेला ब्रेक लागला आहे. नेमक काय आहे संपूर्ण प्रकरण? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी निधीअभावी जिल्ह्यातील तब्बल २६ हजार ३७७ पात्र शेतकरी गेल्या वर्षभरापासून पूर्वसंमतीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या वर्षी जिल्ह्यात ३ लाख ६५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी २१ हजार ७०० शेतकऱ्यांना यंत्र खरेदीसाठी पूर्वसंमती देण्यात आली.
दरम्यान, जिल्ह्यात १९२ कोटी ९२ लाख रुपयांहून अधिक अनुदान वितरित करण्यात आलं. यामध्ये ट्रॅक्टर खरेदीसाठी सर्वाधिक ९४ कोटी ५१ लाख रुपयांचं अनुदान देण्यात आलं. मात्र, यंदा महाडीबीटीवर अर्ज भरूनही पुढील प्रक्रिया रखडली आहे.
लॉटरी, कागदपत्रांची पडताळणी आणि पूर्वसंमती या टप्प्यांना अद्याप गती मिळालेली नाही. तुमच्या मते, शेतकऱ्यांना रखडलेलं अनुदान तातडीने मिळायला हवं का? कमेंट करून तुमचं मत सांगा!





