
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. काय आहे ती अपडेट सगळं काही सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी शासनाने करमाळा-जामखेड रस्त्यासाठी तब्बल ३०० कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातून हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा बनवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यात आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून हे काम होणार आहे. हा रस्ता ४० किलोमीटर लांब आणि १० मीटर रुंद असेल. विशेष म्हणजे, जवळा गावाजवळील सीना नदीवरील सुमारे ५५ वर्षे जुन्या पुलाच्या जागी नवीन आणि अधिक उंच पूल बांधण्यात येणार आहे. पोथरे येथील पुलाची रुंदीही वाढवली जाणार आहे.
गावांच्या परिसरात चौपदरी रस्ता, दुभाजक, फुटपाथ, पथदिवे आणि बंदिस्त गटारांची सुविधाही प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी पुढील दोन महिन्यांत निविदा प्रक्रिया राबवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष काम कधी सुरू होतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुमच्या मते, हा रस्ता झाल्यानंतर परिसराच्या विकासाला किती फायदा होईल? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा!





