
अहिल्यानगर जिल्ह्यातील काकडी येथील तिहेरी हत्याकांड प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी आता दहा ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतलाय. नेमकं प्रकरण काय? सगळं सांगतो. पण आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील भोसले वस्तीवर ५ एप्रिल २०२५ रोजी पहाटे सशस्त्र हल्ला झाला होता. या हल्ल्यात साहेबराव भोसले आणि त्यांचा मुलगा कृष्णा भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. तर साहेबराव यांच्या पत्नी साखरबाई भोसले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या तिहेरी हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी आणि सहा महिन्यांत खटला निकाली काढावा, अशी मागणी जनमंगल ग्रामविकास संस्थेने केली आहे.
जवळकेसह दहा ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव मंजूर करून मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवले आहेत. आता या मागणीवर सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुमच्या मते, गंभीर गुन्ह्यांचे खटले वेळेत निकाली निघण्यासाठी काय उपाय करायला हवेत? कमेंट करून तुमचं मत सांगा!





