Latest

नियतीने डाव साधला… अहिल्यानगर – जामखेड रस्त्यावर स्कॉर्पिओची तीन दुचाकींना धडक ! दोघांचा जागीच मृत्यू; नेमका कसा घडला अपघात ?

अहिल्यानगर-जामखेड रोडवर शनिवारी रात्री भीषण अपघात घडला, ज्यात दोन लोकांचा जागीच मृत्यू झालाय. नेमका कसा घडलाय हा अपघात? सगळं सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, भरधाव स्कॉर्पिओने एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन दुचाकींना धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक तरुण जखमी झाला आहे.

ही घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास निंबोडी शिवारातील हॉटेल उत्सवसमोर घडली. या अपघातात रोहिदास नानासाहेब कडबणे, वय ५१, रा. कडबनेवाडी, ता. जामखेड आणि बाप्पू बाळासाहेब पवार, वय ४५, रा. टाकळीकाझी, अहिल्यानगर यांचा मृत्यू झाला.

तर मयूर तुकाराम शिर्के, वय २६, रा. सारोळाबद्दी, हा जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला आणि मृतांना रुग्णालयात हलवण्यात आलं.

मात्र, अपघातानंतर स्कॉर्पिओचा चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला. पण तुमच्या मते अशा बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई व्हायला हवी का? कमेंट करून नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button