Latest

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक… अहिल्यानगरमध्ये कांदा बाजारभावात पुन्हा मोठी वाढ, या मार्केटमध्ये कांद्याने गाठला ५ हजारांचा टप्पा !

अहिल्यानगरच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत शुक्रवारी कांद्याची ११२१ गोण्यांची आवक झाली. यावेळी दर्जेदार कांद्याला प्रतिक्विंटल तब्बल ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.

मंडळी एक नंबर कांद्याला ३७०० ते ५००० रुपये, नंबर दोनला २३०० ते ३६५० रुपये, तर नंबर तीनला १००० ते २२५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. गोल्टी कांद्याला १५०० ते ३५०० रुपये, तर जोड कांद्याला ८०० ते १६०० रुपये दर मिळाला.

दुसरीकडे डाळिंबाची ३४४५ क्रेट्स आवक झाली. डाळिंबाला प्रतिकिलो १० ते २७५ रुपयांपर्यंत भाव मिळाला. ड्रॅगन फ्रुटला सरासरी ६० रुपये, संत्र्याला १८ रुपये, तर सीताफळाला सरासरी ३६ रुपये प्रतिकिलो दर मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button