
देश स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी वर्ष साजरी करत असतानाच, एका भयानक सामाजिक वास्तवाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातून बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.
श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, अकोले आणि राहाता तालुक्यांमध्ये हजार मुलामागे मुलींचे प्रमाण थेट ३५० ते ४०० वर घसरले आहे!
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने उकल केली असून, त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे हे मोठे जाळे उघडकीस आले आहे. या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत ८ डॉक्टर आणि ३ मेडिकल चालकांसह तब्बल २४ जणांना अटक करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, दुसऱ्या मुलीच्या जन्माची भीती आणि कुटुंबाचा होणारा छळ यामुळे अनेक महिला स्वतः गर्भपाताचा हट्ट धरत असल्याचे तपासात समोर आले आहे. नैसर्गिक समतोल बिघडवणारी ही चिंताजनक बाब असून, समृद्धीचा दावा करणाऱ्या समाजात मुलगी नकोसा वाटणारा हा भेद संपवणे गरजेचे आहे. यावर तुमचे काय मत आहे?





