Latest

कांदा बाजारभावाला उतरती कळा…; अहिल्यानगरच्या ‘या’ मार्केटमध्ये कांद्याचा कमाल भाव ४ हजार ३०० रुपयांवर, पुढे कशी राहणार स्थिती?

कांदा विक्रीसाठी तयार आहे मग आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच. कारण चांगल्या प्रतवारीच्या कांद्याला मिळालेला भाव आणि इतर कांद्याचे दर यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळत आहे.

मंडळी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याची तब्बल २ हजार ४२३ गोण्यांची आवक झाली. यामध्ये एक नंबर प्रतवारीचा, चांगला रंग आणि मोठा आकार असलेल्या कांद्याला सर्वाधिक ४ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

दोन नंबर कांद्याला २ हजार १०० ते ३ हजार १५० रुपये, तीन नंबर कांद्याला १ हजार ते २ हजार ५० रुपये, गोल्टी कांद्याला १ हजार ४०० ते २ हजार ८०० रुपये, तर जोड कांद्याला ५०० ते १ हजार २०० रुपये दर मिळाला.

नवीन कांद्याची आवक वाढत असताना दिवाळीपूर्वी दर वाढतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, सध्या दर स्थिर असल्याने काही शेतकरी कांदा विक्री थांबवत आहेत. बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांना कांद्याची प्रतवारी करून विक्रीस आणण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button