Latest

आता महाराष्ट्रात फ्लॅटधारकांनाही मिळणार सातबारा… कसा आहे सरकारचा नवा निर्णय ?

तुम्ही फ्लॅटमध्ये राहताय ? मग तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता फ्लॅटधारकांनाही जमिनीच्या सातबाराप्रमाणे स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. नेमका कसा आहे महाराष्ट्र सरकारचा नवा निर्णय? जाणून घेऊयात. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

फ्लॅट धारकांना आता व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड मिळणार असून इमारतीतील मोकळी जागा, पार्किंग आणि सामाईक क्षेत्रावरही तुमचा कायदेशीर हक्क नोंदवला जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे.

या निर्णयाचा राज्यातील सुमारे ७ कोटी फ्लॅटधारकांना फायदा होण्याची शक्यता आहे. नव्या व्यवस्थेत डी-१ आणि डी-२ असे दोन नमुने असतील. डी-१ मध्ये संपूर्ण इमारत, जमीन आणि सामाईक जागांची माहिती असेल, तर डी-२ मध्ये प्रत्येक फ्लॅटधारकाचे नाव आणि सदनिकेचे क्षेत्रफळ नोंदवले जाईल.

विशेष म्हणजे फ्लॅटवरील कर्ज, गहाणखत आणि थकबाकीची माहितीही कार्डवर दिसणार आहे. सध्या नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध झाला असून, ३० दिवस हरकती मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर योजना लागू होईल. तर मग मंडळी हा निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button