
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पण नेमकं प्रकरण काय आहे? सांगतो आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, ‘सिरियससिम’ नावाच्या हॅकर ग्रुपने तब्बल ३ लाख ७५ हजार खात्यांचा तपशील आणि २ हजार ७२२ पीडीएफ फाइल्स मिळवल्याचा दावा केला आहे. सायबर सुरक्षा क्षेत्रातील ‘सायबरपल्स५६’ या एक्स खात्यावरून ही माहिती समोर आली आहे.
दाव्यानुसार, या डेटामध्ये ग्राहकांची वैयक्तिक माहिती, पत्ते, खाते उघडण्याचे अर्ज आणि कर्जाशी संबंधित कागदपत्रांचा समावेश असू शकतो. मात्र, या डेटा लीकच्या दाव्याची अद्याप पूर्णपणे पडताळणी झालेली नाही.
एसबीआयनेही याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. अनोळखी कॉल, संशयास्पद लिंक आणि मेसेजपासून सावध राहा. ओटीपी, एटीएम पिन किंवा बँकिंग पासवर्ड कोणालाही सांगू नका. खात्यात संशयास्पद व्यवहार दिसल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधा. तुमचं बँक खातं सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घेता? कमेंटमध्ये नक्की सांगा!





