Latest

कांद्याच्या बाजारभावात मोठी उसळी ! अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना दिलासा, घोडेगावात मिळाला ‘इतका’ रेट

घोडेगाव उपबाजारात कांद्याला पुन्हा चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. उच्च प्रतीच्या कांद्याला तब्बल ५ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाला. शनिवारी झालेल्या लिलावात कांद्याची मोठी आवक झाली.

एक नंबर कांद्याला ४५०० ते ५००० रुपये, दोन नंबरला ४४०० ते ४७०० रुपये, तर तीन नंबर कांद्याला ४२०० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. बाजारात तब्बल २० हजार २६९ गोण्यांची आवक नोंदवण्यात आली.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी कांद्याच्या दरात अचानक सुमारे एक हजार रुपयांची घसरण झाली होती. त्यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी काही काळ लिलाव बंद पाडत बाजारभावाबाबत चिंता व्यक्त केली होती.

आता मात्र दरात सुधारणा झाल्याने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक आणि वाढत्या शेती खर्चाच्या पार्श्वभूमीवर मिळालेला हा चांगला दर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button