
श्रीगोंदा-पारनेरमधील ठेवीदारांसाठी मोठी बातमी डसमोर आलीय ! तब्बल 114 कोटी 93 लाख रुपयांच्या मालमत्तेवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
इनफिनाईट बिकन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मास्टरसिनर्जी एज्युकेट एलएलपी आणि ट्रेडझ इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित स्थावर मालमत्ता, बँक खाती, मुदतठेवी, विमा पॉलिसी, शेअर्स आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर जप्ती आणि गोठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शासनाच्या आदेशात श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील एकूण 17 स्थावर मालमत्तांचा समावेश आहे. याशिवाय विविध बँकांमधील खाती आणि सुमारे 20 कोटी 49 लाख रुपयांच्या मुदतठेवी व विमा पॉलिसींचाही तपशील देण्यात आला आहे.
म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सुमारे 44 कोटी 88 लाख रुपये असल्याचे आदेशातील आकडेवारीवरून दिसते. या मालमत्तांवर आणि आर्थिक गुंतवणुकीवर निर्बंध आणून ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी MPID Act अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.





