Latest

अहिल्यानगरच्या सिस्पे घोटाळ्यात मोठी कारवाई ! पुण्यातील तलाठ्याला अटक ; नेमकं प्रकरण काय ?

अहिल्यानगरमधील बहुचर्चित सिस्पे घोटाळ्यात आता पुण्यातील एका तलाठ्याला अटक करण्यात आली आहे. नेमक काय घडलंय ? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी पुणे जिल्ह्यात तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या दशरथ विठ्ठल रोडे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी श्रीगोंद्यातील गव्हाणवाडी फाटा परिसरातून ताब्यात घेतलं.

दशरथ रोडे हा पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे. मात्र, शासकीय सेवेत असतानाच तो सिस्पे कंपनीसाठी एजंट म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याने अनेक नागरिकांना या कंपनीत पैसे गुंतवण्यासाठी प्रवृत्त केलं असावं, असा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे, रोडे याच्या कुटुंबातील इतर व्यक्तीही कंपनीसाठी एजंट म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून, न्यायालयाने रोडेला २७ ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आता चौकशीतून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागलं आहे. तुमच्या मते, अशा आर्थिक घोटाळ्यांमध्ये दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button