Latest

श्रीरामपूरकरांसाठी आनंदाची बातमी ! आता श्री क्षेत्र देवगडला जाण्यासाठी सुरू झाली नवीन बससेवा, कसं असणार वेळापत्रक ?

श्रीरामपूरकरांसाठी एक खुशखबर आहे, ती म्हणजे श्रीरामपूर ते श्री क्षेत्र देवगड अशी एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. या नव्या बससेवेच वेळापत्रक नेमकं कसं आहे? जाणून घेऊयात. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, एसटी महामंडळाच्या श्रीरामपूर आगाराने भाविकांसाठी श्रीरामपूर ते श्री क्षेत्र देवगड अशी एसटी बससेवा सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

बससेवेच्या वेळापत्रक बाबत बोलायचं झालं तर ही बस दर गुरुवारी सकाळी ९ वाजता श्रीरामपूर आगारातून सुटेल आणि सव्वादहा वाजता देवगडला पोहोचेल. तसेच दर्शनानंतर सकाळी सव्वाअकरा वाजता ही बस पुन्हा श्रीरामपूरकडे रवाना होईल.

या बससेवेचं टाकळीभानमध्ये पूजन करून स्वागत करण्यात आलं. चालक आणि वाहकांचाही सत्कार करण्यात आला. या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सर्वसामान्य भाविकांना देवदर्शनासाठी जाणं अधिक सोयीचं होणार आहे. तर मग मंडळी तुम्हाला श्रीरामपूर आगाराची ही बससेवा कशी वाटली ? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button