
दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याची चिंता वाढलीय ? आता ‘मागेल त्याला मुरघास’ योजनेतून पशुपालकांना अनुदान मिळू शकतं. पण कोणाला आणि किती लाभ मिळणार ? सांगतो. आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यावर सरकारने भर दिला आहे. यासाठी ‘मिशन मुरघास’ मोहीम राबवली जात आहे. विशेष म्हणजे, विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये ‘मागेल त्याला मुरघास’ योजना राबवण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत पात्र दूध उत्पादक शेतकरी आणि पशुपालकांना प्रत्येक जनावरासाठी दररोज ५ किलो मुरघास, ९० दिवसांच्या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्याचं नियोजन आहे. यासाठी प्रति किलो ३ रुपये अनुदान दिलं जाणार आहे.
मुरघास खरेदीचा पुरावा सादर केल्यानंतर अनुदान थेट बँक खात्यात जमा केलं जाईल. योजनेसाठी अर्ज करण्यासाठी vmddp.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. अर्ज करण्यापूर्वी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती तपासा. तुमच्याकडे किती जनावरं आहेत? कमेंटमध्ये नक्की सांगा.





