
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. दुष्काळामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ दिला जाणार आहे. मात्र, यासाठी काही अटी घालून देण्यात आल्या आहेत. नेमक्या कोणत्या आहेत या अटी? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने परीक्षा शुल्क माफीची सूचना दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांचं शुल्क शाळांनी अद्याप मंडळाकडे जमा केलेलं नाही, त्यांना हे पैसे शाळांनी तातडीने परत करायचे आहेत. याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर असेल.
ज्या विद्यार्थ्यांचं शुल्क मंडळाकडे जमा झालं आहे, त्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात पैसे परत केले जाणार आहेत. त्यामुळे आधार क्रमांक आणि बँक खात्याची माहिती अचूक असणं महत्त्वाचं आहे.
तसंच, दुष्काळग्रस्त भागातील ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज अजून भरलेले नाहीत, त्यांचे अर्ज सात दिवसांत भरण्याची सूचना देण्यात आली आहे. पुनर्परीक्षा देणारे विद्यार्थीही या योजनेसाठी पात्र असतील. तर मग मंडळी, तुम्हाला शासनाचा हा निर्णय कसा वाटला? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.





