
तुमच्या घरात वापरले जाणारे धने आणि बडीशेप सुरक्षित आहेत का ? हा सवाल आता उपस्थित होतोय. कारण संगमनेरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत तब्बल १५ लाख रुपयांचा संशयास्पद साठा जप्त केलाय! नेमकं काय घडलं? सांगतो. आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, नाशिक विभागाचे संयुक्त आयुक्त श्री. माने आणि सहायक आयुक्त एस. एच. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली २४ ऑक्टोबरला ही कारवाई करण्यात आली. संगमनेरमधील मेसर्स जगदंबा फूड प्रॉडक्ट्सवर छापा टाकून तब्बल ९ हजार ५९६ किलो धने डाळ आणि बडीशेप जप्त करण्यात आली.
याची एकूण किंमत आहे १५ लाख ५६६ रुपये! हा साठा गुजरातमधील उंझा येथील डी. ए. पटेल यांच्याकडून मागवण्यात आला होता. अन्न सुरक्षा अधिकारी यु. आर. सूर्यवंशी आणि एस. एच. इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. जप्त मालाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे. पण, तुम्ही मसाले खरेदी करताना गुणवत्ता तपासता का? कमेंटमध्ये सांगा.





