
अहिल्यानगरच्या वाकोडीत घडलेल्या एका घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. ज्या मुलांकडून वडिलांच्या आधाराची अपेक्षा असते, त्याच मुलांवर पित्याच्या हत्येचा संशय आल्याने खळबळ उडाली आहे. नेमकं घडलं काय? सगळं सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, २४ ऑक्टोबरच्या रात्री अकराच्या सुमारास वाकोडी शिवारात पाण्याच्या टाकीजवळ दिलीप करमदास भोसले यांचा मृतदेह आढळला. अज्ञात व्यक्तींनी मारहाण करून त्यांची हत्या केल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला.
घटनास्थळाची पाहणी, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली. या तपासात मृत दिलीप भोसले यांचे मुलगे अंबर आणि रोहित यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला.
पोलिसांनी १९ वर्षीय अंबर दिलीप भोसले याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करत आहेत. पण मंडळी, अशा घटनांना आळा घालण्यासाठी काय केलं पाहिजे? कमेंटमध्ये तुमचं मत सांगा.





