
मंडळी, स्वतःच्या कामातून वेळ काढून दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवता येतो, हे अहिल्यानगरच्या एका युवा उद्योजकाने दाखवून दिलंय!
कोठे खुर्द गावांतर्गत खांडगेदरा येथील अक्षय ढोकरे यांनी परिसरातील तब्बल २५० महिलांना लोणावळ्यातील आई एकविरा देवीचं मोफत दर्शन घडवलं. रविवारी १८ ऑक्टोबरला हा उपक्रम पार पडला.
विशेष म्हणजे, महिलांसाठी नाश्ता, जेवण आणि देवीला अर्पण करण्यासाठी चोळी-पातळ यांचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे महिलांना कोणताही आर्थिक भार न घेता देवीचं दर्शन घेता आलं.
पण अक्षय ढोकरे यांचा हा पहिलाच उपक्रम नाही. याआधी नवरात्रोत्सवात त्यांनी अडीचशे ते तीनशे महिलांना वणीच्या सप्तशृंगी मातेचं दर्शन घडवलं होतं.
आता पुढील वर्षी नवरात्रोत्सवात महिलांना कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला नेण्याचा त्यांचा संकल्प आहे. अक्षय यांचा हा संकल्प पाच वर्षाचा आहे.
तर मग मंडळी, तुम्हाला अक्षय ढोकरे यांचा हा उपक्रम कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच स्थानिक बातम्यांसाठी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा!





