
अहिल्यानगरमध्ये एका युवा क्रिकेटपटूचा जीव गेला आणि आता या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. नेमकं काय आहे प्रकरण ? सगळं सांगतो आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी २४ ऑक्टोबरला पहाटे दोनच्या सुमारास प्रेमदान चौकात झालेल्या अपघातात यश अविनाश जाधव याचा दुर्दैवी मृत्यू झाला. टँकर चुकीच्या दिशेने येत असल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप त्याच्या मित्रांनी केला आहे.
या घटनेनंतर संतापलेल्या नगरसेवकांनी आमदार संग्राम जगताप आणि महापौर ज्योती गाडे यांच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिलं. संबंधित टँकर चालक आणि मालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
यश हा अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू होता. त्याच्या जाण्याने शहराने एक गुणी खेळाडू, मित्रांनी जिवाभावाचा मित्र, तर जाधव कुटुंबाने आपला एकुलता एक मुलगा गमावला आहे. तुमच या घटनेबद्दल काय मत आहे ? कमेंटमध्ये नक्की सांगा.





