Latest

सोन्याचे रेट २६ टक्क्यांनी घसरले… कारण काय ? आता खरेदी करावी की आणखी वाट पाहावी ?

सोन्याचे भाव २६ टक्क्यांहून अधिक घसरले, मग ही गुंतवणुकीची संधी आहे की अजून मोठी घसरण बाकी आहे? चला समजून घेऊयात. पण आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, मुलीच्या लग्नासाठी सोनं खरेदी करायचं असेल किंवा भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

सोन्याच्या विक्रमी उच्चांकावरून झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांचं लक्ष पुन्हा सोन्याकडे वळलंय. पण सोन्याचे भाव नेमके का घसरत आहेत? तर मंडळी डॉलर मजबूत होणं, व्याजदर उंच राहण्याची शक्यता आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे सोन्यावर दबाव निर्माण झालाय.

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सोन्याचे दर आणखी खाली येऊ शकतात. मात्र, पुढील दोन ते तीन महिन्यांत दर सावरून १० ते १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

मात्र, हे केवळ अंदाज आहेत. दरवाढीची कोणतीही हमी नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना एकाच वेळी मोठी रक्कम लावण्याऐवजी टप्प्याटप्प्याने खरेदीचा विचार करा. तुमच्या मते सोन्याचे रेट आणखी वाढतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button