Latest

दुष्काळी शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! एनडीआरएफ निकषापेक्षा जास्त पैसे मिळणार ? पंचनाम्याबाबतही मोठा निर्णय, सरकारचा प्लॅन काय ?

मंडळी, राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. काय आहे नवीन अपडेट? सगळ सांगतो. पण आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी पंचनामे पूर्ण झाले नसले, तरी शेतकऱ्यांची पाच हजार रुपयांची दुष्काळी अग्रिम मदत अडकू नये, यासाठी सरकारकडून पर्याय तपासले जात आहेत.

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत या विषयाचा आढावा घेतला. अ‍ॅग्रीस्टॅकवर नोंदणी असलेल्या आणि शेतकरी आयडी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पंचनाम्यांची वाट न पाहता मदत जमा करता येईल का, यावरही चर्चा झाली.

दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या म्हणजेच एनडीआरएफच्या निकषांपेक्षा अधिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे. सध्या कोरडवाहू पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये, तर बागायती पिकांसाठी हेक्टरी बारा हजार पाचशे रुपये मदतीचे निकष आहेत.

काही नेत्यांनी हेक्टरी एक लाख रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. त्यामुळे वाढीव मदतीबाबत प्रशासनाकडून चाचपणी सुरू असल्याचं समजतं. पण तुम्हाला काय वाटतं? सरकार खरंच निकषाबाहेर जाऊन मदत करणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button