
श्रीरामपूरच्या पढेगावमध्ये एका विवाहितेच्या मृत्यूनंतर संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. माहेरच्या नातेवाइकांनी थेट सासरच्या घराच्या दारातच तिचा अंत्यविधी केला. पण हे टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण काय ? सगळं सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो करायला विसरू नका.
मंडळी, सुकन्या विशाल घोडे असं मृत विवाहितेचं नाव आहे. अवघ्या अडीच वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं. तिला सव्वा वर्षाचा मुलगाही आहे.
मात्र, जमीन खरेदी करण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, यासाठी सासरच्या मंडळींकडून छळ केला जात असल्याचा आरोप तिची आई विद्या देवकर यांनी केला आहे. पती मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या छळाला कंटाळून सुकन्याने १९ तारखेला राहत्या घरी गळफास घेतल्याचं फिर्यादीत नमूद आहे. घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी सासरच्या घरात अंत्यविधी करण्याचा आग्रह धरला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
अखेर घराच्या दारातच अंत्यविधी करण्यात आला. या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली असून सात जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. या घटनेबाबत तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.





