
या विकेंडला थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याची गरज नाही ! कारण या विकेंडला ओटीटीवर मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार आहे. भक्ती, थरार, सस्पेन्स आणि सुपरहिरो अॅक्शन…असं सगळं काही पाहायला मिळणार आहे. ओटीटीवर कोणते ५ चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होणार? जाणून घ्या. पण आधी अहिल्यानगर सिनेटॉल्कला फॉलो नक्की करा.
मंडळी, सर्वात आधी चर्चा आहे ‘हनुमान अंश’ सिनेमाची. नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट २७ नोव्हेंबरला सोनी लिव्हवर आणि २९ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
त्यानंतर ‘ढाई चाल’ ही पॉलिटिकल थ्रिलर सीरिज जिओ हॉटस्टारवर दाखल झाली आहे. सस्पेन्सचा बादशाह असलेल्या ‘दृश्यम ३’मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा प्रेक्षकांना गुंतवून ठेवणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
तर सुपरहिरो चाहत्यांसाठी ‘सुपरगर्ल’ जिओ हॉटस्टारवर पाहता येणार आहे. याशिवाय ‘स्पायडरमॅन : ब्रँड न्यू डे’चीही चर्चा आहे. तर मग मंडळी यापैकी कोणता चित्रपट किंवा वेबसीरिज तुम्ही सर्वात आधी पाहणार? कमेंटमध्ये नक्की सांगा !





