Latest

गांधी मैदान ते एमजी रोड….; महात्मा गांधींच्या एका भेटीने बदलला अहिल्यानगरचा इतिहास, मिळाली नवी ओळख; राष्ट्रपिता गांधीजींचे नगरशी होतं खास नातं !

महात्मा गांधी आणि अहिल्यानगरचं नातं केवळ इतिहासाच्या पानांपुरतं मर्यादित नाही, तर शहराच्या रस्त्या-रस्त्यांत आजही त्यांच्या आठवणी जिवंत आहेत !

१८ फेब्रुवारी १९२७… याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी तत्कालीन अहमदनगरला पहिली ऐतिहासिक भेट दिली. नगरपालिकेच्या वतीने विश्रामबागच्या मैदानावर त्यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो नगरकरांची गर्दी जमली होती.

पण गांधीजींचं नगरशी नातं इथेच थांबलं नाही. १९३० मध्ये सविनय कायदेभंगाच्या चळवळीदरम्यान अडाचे मैदानावर झालेल्या सभेत त्यांनी इंग्रजांचे कायदे न पाळण्याचा मंत्र दिला. पुढे याच मैदानाला गांधी मैदान म्हणून ओळख मिळाली.

इतकंच नाही, तर गुजरातमधील प्लेगच्या संकटात गांधीजींनी नगरचे आचार्य गंगाधरशास्त्री गुणे यांची मदत मागितली होती. गांधीजींच्या निधनानंतर १० फेब्रुवारी १९४८ रोजी नगरपालिकेने ठराव करून नवीन मार्केट तथा गंभीरमेल पेठ परिसराला ‘महात्मा गांधी रस्ता’ हे नाव दिलं जो की आज एमजी रोड या नावाने ओळखला जातो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button