Latest

आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! मिळणार दरवर्षी बारा हजार रुपयांची स्कॉलरशिप, ठेवलीये फक्त एक अट….

आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे ! आता गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरवर्षी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळू शकते.

मंडळी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती म्हणजेच NMMS परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपये, म्हणजेच चार वर्षांत एकूण ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.

यासाठी विद्यार्थी सध्या आठवीत शिकणारा असावा. पालकांचे वार्षिक उत्पन्न साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच सातवीत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ५५ टक्के, तर अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के गुण आवश्यक आहेत.

परीक्षेत बौद्धिक क्षमता आणि शालेय क्षमता अशा दोन चाचण्या घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक चाचणी ९० गुणांची असेल. अर्ज शाळेमार्फत ऑनलाइन भरायचा असून नियमित शुल्कासह अर्जाची अंतिम मुदत ७ ऑक्टोबर आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी ही संधी गमावू नका! आपल्या शाळेशी संपर्क साधा आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button