Latest

बँक बंद पडली तर FD चे पैसे परत मिळणार की बुडणार ? १० लाखांपैकी किती रिटर्न मिळणार ? RBI चा नियम जाणून घ्या !

बँकेत १० लाखांची FD केल्यास आणि बँक बुडाली तर किती पैसे मिळणार ? जाणून घ्या महत्त्वाचा नियम! तुम्ही बँकेत लाखो रुपये FD करून ठेवले आहेत का? पण समजा, अचानक ती बँक आर्थिक अडचणीत आली किंवा बंद पडली, तर तुमच्या पैशांचं काय होईल? संपूर्ण रक्कम सुरक्षित राहील का? याबाबतचा एक महत्त्वाचा नियम प्रत्येक ठेवीदाराने जाणून घेणं गरजेचं आहे.

DICGC म्हणजेच डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून बँकेतील ठेवींना विमा संरक्षण दिलं जातं. मात्र, हे संरक्षण प्रत्येक जमाकर्त्यासाठी एका बँकेत जास्तीत जास्त ५ लाख रुपयांपर्यंत असतं. विशेष म्हणजे, या रकमेत मूळ ठेवीसोबत व्याजाचाही समावेश होतो.

म्हणजेच, तुमची FD १० लाखांची असेल आणि बँक अपयशी ठरली, तर विमा संरक्षण फक्त ५ लाखांपर्यंतच मिळतं. त्याचबरोबर एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये किंवा अनेक FD केल्याने विमा मर्यादा वाढत नाही. त्यामुळे FD करताना केवळ व्याजदर पाहू नका, तर बँकेचं DICGC विमा संरक्षणही तपासा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button