Latest

नव्या बुलेटचा आनंद क्षणात हिरावला…; नेवासा-श्रीरामपूर हायवेवर तीन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू; एकाच ठिकाणी दफनविधीने गाव हळहळलं !

घरात नवीन बुलेट आली… तीन भावांच्या चेहऱ्यावर आनंद होता… पण त्याच बुलेटवरचा प्रवास त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरेल, असं कुणालाही वाटलं नव्हतं !

अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा गावावर काळाने असा घाला घातला की संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं.
आदित्य अंबादास आहिरे वय १६, दीपक अंबादास आहिरे वय १४ आणि चैतन्य अंबादास आहिरे वय १२, हे तिघे सख्खे भाऊ गुरुवारी रात्री नवीन दुचाकीवरून राहाता येथील नातेवाईकांकडे निघाले होते.

मात्र, नेवासा-श्रीरामपूर मार्गावरील पुनतगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की तिघेही गंभीर जखमी झाले. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केलं.

विशेष म्हणजे, नवीन दुचाकीला नंबरही मिळाला नव्हता. सीटवरील ‘आहिरे’ या नावामुळे तिघांची ओळख पटली. शुक्रवारी तिन्ही भावांचा एकाच ठिकाणी दफनविधी करण्यात आला. तीन चिमुकल्यांच्या जाण्याने एका कुटुंबाचा आनंद कायमचा हिरावला गेला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button