Latest

भगवान बाबांपासून कृष्णा महाराजांपर्यंत… भगवान गडाची गादी कशी पुढे सरकली ? पाहा भगवान गडाचा ७५ वर्षांचा इतिहास…

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि अध्यात्मात भगवान गडाला अनन्यसाधारण महत्व आहे. पण या गडाची स्थापना कशी झाली, आजपर्यंत गडाची धुरा कोणकोणत्या महंतांनी सांभाळली ? जाणून घेऊयात. त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

पाथर्डी तालुक्यात असलेल्या भगवान गडाची स्थापना १९५१ मध्ये दसऱ्याच्या दिवशी संत भगवान बाबा यांनी केली. ते गडाचे पहिले मठाधिपती होते. पुढे त्यांच्या पश्चात भीमसिंह महाराजांनी गादीची जबाबदारी सांभाळली. तब्बल ३८ वर्षे त्यांनी गडाचं नेतृत्व केलं.
त्यानंतर २००३ मध्ये भीमसिंह महाराजांच्या निधनानंतर डॉ. नामदेव महाराज शास्त्री गादीवर विराजमान झाले.

जवळपास २२ वर्षे त्यांनी गडाची धुरा सांभाळली. आता २०२६ मध्ये गडाच्या अमृत महोत्सवी वर्षात नामदेव महाराजांनी कृष्णा महाराज शास्त्री यांच्याकडे उत्तराधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे.

भगवान गड हा केवळ श्रद्धेचं स्थान नाही, तर शिक्षण, समाजप्रबोधन आणि राजकीय घडामोडींचंही केंद्र राहिला आहे. गोपीनाथ मुंडेंपासून सुरू झालेली दसरा मेळाव्याची राजकीय परंपराही गडाच्या इतिहासातील महत्त्वाचा भाग आहे. गडाचा हा इतिहास तुम्हाला माहीत होता का? कमेंटमध्ये सांगा!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button