
बांगलादेशातून थेट अहिल्यानगरच्या केडगावपर्यंत पोहोचलेल्या महिलेच्या वास्तव्याने आता पोलिस तपासाला वेगळं वळण मिळालंय!
दीपनगर परिसरात महिलांना जागा उपलब्ध करून देत अनैतिक व्यापार सुरू असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. त्यानंतर दक्षिण कमांड लष्करी गुप्तचर विभागाच्या सहकार्याने संयुक्त कारवाई करण्यात आली.
१९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या कारवाईत सईदा अफसर खान आणि छोटूराम नारायण रायजी यांना ताब्यात घेण्यात आलं. घटनास्थळी एक महिला आढळली. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, तिचं बांगलादेशी नागरिकत्व असल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं आहे.
चौकशीत तिच्या पतीचं नाव एम. डी. टुटुल मुल्ला असून, तो बांगलादेशातील कुलना येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली.
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यातील विविध कलमांनुसार कारवाई सुरू आहे. महिलेचं भारतातील वास्तव्य आणि नागरिकत्वाशी संबंधित बाबींचाही तपास सुरू आहे.





