Latest

“हा’ फॉर्म ऑनलाइन भरा; अन् थेट दहावी-बारावीच्या परीक्षेला बसा!

दहावी-बारावीचं शिक्षण अर्धवट राहिलंय.. नियमित शाळेत जाता आलं नाही, पण आता पुन्हा परीक्षा देऊन शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा आहे? तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे नियमित शाळेत जाऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आता थेट दहावी किंवा बारावीच्या बोर्ड परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे. यासाठी ‘१७ नंबरचा फॉर्म’ हा पर्याय उपलब्ध आहे.
विशेष म्हणजे, मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी हा फॉर्म आता ऑनलाइन भरता येणार आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही ही संधी महत्त्वाची आहे. अधिकृतपणे दहावी उत्तीर्ण झालेले, मात्र कनिष्ठ महाविद्यालयात नियमित वर्ग करणे शक्य नसलेले विद्यार्थी, नोकरी किंवा वैयक्तिक अडचणींमुळे शिक्षणात सातत्य राखता न आलेले विद्यार्थी खासगी उमेदवार म्हणून या पर्यायाचा विचार करू शकतात.

या नोंदणीसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक हजार ११० रुपये नोंदणी शुल्क आणि १०० रुपये प्रक्रिया शुल्क, असे एकूण १ हजार २१० रुपये शुल्क निश्चित केले आहे. मंडळी , ही महत्वाची बातमी जास्तीजास्त शेअर करा जेणे करून गरजूना त्याचा लाभ होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button