
धार्मिक परंपरेचा ७२ वर्षांचा प्रवास अखेर थांबलाय ! विठ्ठल-बिरुदेव देवस्थानचे ज्येष्ठ मानकरी फरांडे बाबा यांनी वयाच्या १०२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नेमका कसा राहिलाय त्यांचा प्रवास ? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, विश्वनाथ नारायण वाघमोडे उर्फ फरांडे बाबा असं त्यांचं नाव. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या अंजनगाव या त्यांच्या मूळ गावी गुरुवारी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं.
पट्टणकोडोली येथील श्री क्षेत्र विठ्ठल-बिरुदेव देवस्थानच्या यात्रेत भाकणुकीचा मुख्य मान अंजनगावच्या खेलोबा देवस्थानच्या पुजाऱ्याला मिळतो. ही परंपरा जपण्यासाठी फरांडे बाबांनी तब्बल ७२ वर्षे अंजनगाव ते पट्टणकोडोली असा पायी प्रवास केला.
त्यांच्या धार्मिक निष्ठेने आणि सात्त्विक स्वभावाने त्यांना मोठा भक्तपरिवार मिळाला होता. आता भाकणुकीचा मान त्यांचे नातू खेलुदेव वाघमोडे फरांडे महाराज सांभाळत आहेत. त्यांच्या निधनाने धार्मिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.





