
अहिल्यानगरमध्ये एका तरुणाच्या हत्येचं धक्कादायक प्रकरण समोर आलंय. नेमकं काय घडलं? सांगतो. त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
गणेश मच्छिंद्र गायकवाड, वय ३२ वर्षे. मूळचा श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूरचा. पुण्यात नोकरी करणाऱ्या गणेशचा मृतदेह थेट मुळा धरणाच्या बॅकवॉटर कालव्यात आढळून आला.
१७ ऑक्टोबरच्या रात्री गणेश दारू पिऊन शिंगवे नाईक गावातील एका घरात शिरत असल्याचा फोन त्याच्या भावाला आला होता. त्याला पकडून ठेवल्याचंही सांगण्यात आलं.
यानंतर भावाने गावातील नागरिकांकडे चौकशी केली. त्यातून गणेशला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कालव्यात फेकल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
२० ऑक्टोबरला वांबोरीजवळील कुक्कडवेढा शिवारात गणेशचा मृतदेह सापडला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी योगेश जाधव आणि महेश जाधव या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्यांना ताब्यात घेतलं आहे. तुमच्या मते, अशा घटनांना आळा घालण्यासाठी काय केलं पाहिजे? कमेंटमध्ये सांगा.





