Latest

अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचा कहर… या मार्केटमध्ये ७५ हजारांची दुधाळ गाय फक्त ६ हजाराला !

दुष्काळाची झळ आता थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत पोहोचली आहे. शेतकऱ्यांना दुधाळ जनावर सुद्धा विकावी लागत आहेत. नेमक काय आहे संपूर्ण प्रकरण? सांगतो. पण आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी, ज्या गायीला काही महिन्यांपूर्वी ७५ हजार रुपये मोजले, त्याच गायीला आज अवघ्या सहा हजार रुपयांत विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

आळेफाटा येथील बाजारात दिसलेलं हे चित्र काळीज पिळवटून टाकणारं आहे. एकीकडे वाढती महागाई, तर दुसरीकडे चारा आणि पाण्याची टंचाई. अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकला आहे. दुधाळ गाय म्हणजे अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आधार.

तिच्या दुधातून मिळणाऱ्या पैशांवर घरखर्च भागवला जातो. पण आता जनावरांसाठी चारा विकत घेण्याचीही ऐपत राहिलेली नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे जपलेल्या जनावरांना नाइलाजाने बाजारात विक्रीसाठी आणावं लागत आहे.

‘गाय विकताना खूप वाईट वाटतं; पण चारा-पाणी आणण्याचीही ऐपत उरलेली नाही,’ अशी व्यथा एका शेतकऱ्याने मांडली. दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या संकटाची ही गंभीर झलक आहे. शेतकऱ्यांची जनावरं वाचवण्यासाठी सरकारने काय करायला हवं ? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button