
मृत्यू हा विषय अनेकांना घाबरवतो. पण गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाच्या आयुष्यातील शेवटचे दिवस नेमके कसे असतात ? याचा कधी विचार केला आहे का? नाही ना? चला मग जाणून घेऊयात. पण आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मृत्यूच्या २४ तास आधी ३ लक्षणं दिसतात. पहिलं लक्षण म्हणजे भावनिक संवाद वाढणं. काही रुग्ण आपल्या जवळच्या व्यक्तींना मनातलं सांगतात, प्रेम व्यक्त करतात किंवा जुन्या गोष्टींची आठवण काढतात. दुसरं म्हणजे माफी मागण्याची किंवा अपूर्ण इच्छा व्यक्त करण्याची भावना.
कुटुंबीयांशी बोलून मनातल्या गोष्टी मोकळ्या करण्याचा प्रयत्न काही रुग्ण करतात. तिसरं म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्थितीत बदल. झोप वाढणं, प्रतिसाद कमी होणं किंवा संवाद साधण्याची इच्छा बदलणं अशी लक्षणं आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात दिसू शकतात.
मात्र, ही लक्षणं प्रत्येक रुग्णात दिसतातच असं नाही. त्यावरून मृत्यूची नेमकी वेळ सांगता येत नाही. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला आणि रुग्णाला भावनिक आधार देणं महत्त्वाचं आहे. तुमच्या मते, आयुष्याच्या शेवटच्या क्षणी माणसाला सर्वाधिक आठवण कोणाची येत असेल? कमेंटमध्ये सांगा.





