
साप चावण्याचा धोका नेमका कोणत्या वेळी जास्त असतो, माहिती आहे का ? नाही ना; चला मग जाणून घेऊयात. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी, एम्स देवघर आणि अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने केलेल्या अभ्यासात दोन लाख १४ हजार सर्पदंशाच्या नोंदींचा डेटा तपासण्यात आला.
ह्या नव्या संशोधनानुसार, दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळेत सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना नोंदवल्या गेल्या आहेत. वेळेची माहिती उपलब्ध असलेल्या १५ हजार ९३१ घटनांमध्ये तब्बल ३९ टक्के घटना दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळेत घडल्या.
तर संध्याकाळी ६ ते मध्यरात्रीदरम्यान २९ टक्के घटना नोंदल्या गेल्या. शेती आणि कृषी कामांशी संबंधित ठिकाणी सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडल्याचंही समोर आलं आहे. मग शेतात काम करताना काय काळजी घ्यावी?
गवत किंवा झुडपांमध्ये जाताना बूट आणि लांब कपडे वापरा. अंधारात टॉर्च वापरा आणि साप दिसल्यास त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका. माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओ जास्तीत-जास्त शेअर करा आणि संशोधनाबद्दलचं तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.





