
२२ सप्टेंबरपासून बीड-पुणे दैनिक एक्सप्रेस नियमित धावणार असून, अहिल्यानगरच्या प्रवाशांसाठी मुंबई प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. बीडहून रात्री ९.३० वाजता सुटणारी ही ट्रेन अहिल्यानगरमार्गे पहाटे ५.२० वाजता पुणे जंक्शनला पोहोचेल.
यानंतर पुण्याहून सकाळच्या मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या पकडता येणार आहेत. सिंहगड एक्सप्रेस ६.०५ वाजता सुटून ९.५५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचते.
डेक्कन क्वीन ७.१५ वाजता सुटून १०.२५ वाजता, तर प्रगती एक्सप्रेस ७.४५ वाजता सुटून ११.२५ वाजता मुंबईत पोहोचते. मंत्रालय, न्यायालय किंवा कार्यालयीन कामासाठी मुंबईला जाणाऱ्या नगरकरांना याचा फायदा होऊ शकतो.
विशेष म्हणजे प्रवासखर्चातही बचत होण्याची शक्यता आहे. रेल्वेचे अंदाजे जनरल भाडे ६० ते ८० रुपये, तर स्लीपरचे १४० ते १६० रुपये असू शकते. म्हणजेच बस, कॅब किंवा ट्रॅव्हल्सच्या तुलनेत हा पर्याय खिशाला हलका ठरू शकतो.





