Latest

ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या हॉटेल ‘सचिन’मध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची अचानक एंट्री; नगरच्या राजकारणात चर्चेला उधाण !

अहिल्यानगरच्या राजकारणात सध्या एका अचानक झालेल्या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे! पुण्याहून बीड दौऱ्यावर जात असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी १४ ऑगस्ट रोजी केडगाव येथील ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या ‘हॉटेल सचिन’मध्ये अचानक थांबा घेतला.

यावेळी सुनेत्रा पवार यांनी कोतकर कुटुंबीयांची भेट घेतली. काही वेळ झालेल्या या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.

ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती? आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे का? याबाबत सध्या विविध राजकीय तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

विशेष म्हणजे, अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात कोतकर कुटुंबाचे असलेले महत्त्व आणि सुनेत्रा पवार यांची अचानक झालेली भेट यामुळे चर्चांना आणखी रंग चढला आहे.

मात्र या भेटीमागचं नेमकं कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button