
‘देऊळ बंद 2’ पाहायचा राहून गेलाय ? आता थिएटरची गरज नाही! कारण हा गाजलेला मराठी सिनेमा थेट तुमच्या घरात पोहोचला आहे !
‘देऊळ बंद 2’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 100 कोटी रुपयांचा टप्पा पार करत मराठी चित्रपटसृष्टीत मोठी कामगिरी केली. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
आता हा सिनेमा ओटीटीवरही उपलब्ध झाला आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ‘देऊळ बंद 2’ आता ॲमेझॉन प्राइमवर पाहता येणार असल्याची माहिती दिली आहे.
सिनेमात मोहन जोशी यांनी स्वामी समर्थांची भूमिका साकारली असून, स्नेहल तरडे यांच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळाली.
विशेष म्हणजे सिनेमाच्या शेवटी राघव शास्त्रीची भूमिका साकारणाऱ्या गश्मीर महाजनीला अमेरिकेत असताना अक्कलकोटहून स्वामी समर्थांचा फोन येतो. त्यामुळे आता ‘देऊळ बंद 3’मध्ये पुढे काय घडणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. तुम्ही ‘देऊळ बंद 2’ पाहिला आहे का?





