Latest

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २०१९ चा तोच फॉर्मुला वापरला जाणार ! इतक्या जागा बिनविरोध होणार, पडद्यामागे नेमकं काय घडतंय ?

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रंगत आता वाढली आहे. ७ जागा बिनविरोध करण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये पडद्याआडून वाटाघाटी सुरू असल्याची चर्चा आहे. आज अंतिम मतदार यादी जाहीर होणार असून, त्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

प्रारूप मतदार यादीवर सर्वाधिक हरकती संगमनेरमधून आल्या होत्या. त्यामुळे किती हरकती मान्य होतात आणि किती फेटाळल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. प्रारूप यादीत ३ हजार ६४७ ठराव पात्र ठरले होते.

२०१९ मध्ये जिल्हा बँकेच्या २१ पैकी तब्बल १७ जागा बिनविरोध झाल्या होत्या. यंदाही बिनविरोधचा फॉर्म्युला वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मात्र खरी कसोटी असेल ती सत्तेच्या वाटणीची ! मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सभापती राम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सत्तेचे समीकरण कसे जुळते, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button