Latest

कापसाचे भाव अचानक कोसळले ! सरकारच्या एका निर्णयाने बाजाराचा मूड बदलला; नेमका कसा आहे सरकारचा नवा निर्णय

कापूस विकून चार पैसे जास्त मिळतील, अशी आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांना आता मोठा धक्का बसलाय ! केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे कापसाचे बाजारभाव घसरू लागले आहेत. सरकारने नेमका असा कोणता निर्णय घेतलाय, ज्यामुळे बाजारभाव घसरू लागले आहेत. जाणून घेऊयात, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, केंद्र सरकारने परदेशातून कापूस आयात करण्यावरील सीमाशुल्क सवलत आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. खरे तर ही मुदत 31 ऑक्टोबर रोजी संपली होती. पण, कापड उद्योगाच्या लॉबीकडून दबाव वाढल्याने सरकारने ही सवलत आणखी दोन महिने वाढवली. त्यामुळे परदेशातून कापसाची आयात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याचा परिणाम बाजारभावावर दिसू लागलाय. यवतमाळच्या आर्णी बाजारपेठेत क्विंटलमागे ९ हजार ५०० रुपयांवर असलेला कापसाचा भाव थेट ९ हजार १०० रुपयांवर आला आहे.

दुसरीकडे, सीसीआयकडून ८ हजार ६०० रुपये हमीभावाने खरेदी सुरू आहे. आधीच दुष्काळामुळे उत्पादन घटलंय आणि आता भावही घसरत आहेत. तर मग मंडळी तुम्हाला शासनाचा हा नवा निर्णय कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button