Latest

८० हजारांचं इंजेक्शन ७ हजाराला… कॅन्सरच्या औषधांच्या किमतीत मोठी कपात ! कोणतं औषध किती स्वस्त ? पाहा संपूर्ण यादी !

कॅन्सरशी लढणाऱ्या रुग्णांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. कारण महागड्या औषधांच्या किमतीत सरकारने मोठी कपात केली आहे. पण, कोणतं औषध किती स्वस्त झालंय, ते सांगतो. त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाच्या निर्णयानुसार ३९७ औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. यात थिओटेपा इंजेक्शनची किंमत ८०,०७१ वरून ७,१५० रुपये. पॅल्बोसायक्लिब कॅप्सूलची किंमत ४०,४२१ वरून २,७२० रुपये.

एबिरालाईव्ह टॅब्लेटची किंमत २८,००० वरून ४,८४० रुपये. वोमाझोल (१० गोळ्या) पॅकेटची किंमत ४५८.८५ वरून ३९.५२ रुपये. इवुझुमॅब (४०० मिग्रॅ इंजेक्शनची किंमत ६९,८५२ वरून १३,५१२ रुपये करण्यात आली आहे.

हे नवीन दर ९ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. मात्र, कीट्रुडा, रिबोसायक्लिब, टॅग्रिसो आणि टेसेंट्रिक यांसारख्या काही औषधांच्या किमतीत बदल झालेला नाही. तर मग मंडळी तुम्हाला सरकारचा हा निर्णय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button