Latest

श्रीरामपूरकरांसाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा महत्त्वाचा निर्णय…. आता आठवड्यातून इतके दिवस मिळणार पाणी !

दिवाळीच्या तोंडावर श्रीरामपूरकरांवर पाणीकपातीचं संकट आलं होतं. आठवड्यातून फक्त एकदाच नळाला पाणी येत होतं. मात्र, आता शहरवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भंडारदरा धरणाचं आवर्तन १५ दिवस आधी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नेमका कसा आहे हा निर्णय? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापूर्वी १५ डिसेंबरला सोडण्यात येणारं आवर्तन आता लवकर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे श्रीरामपूर नगरपालिकेने पाणीपुरवठा आठवड्यातून दोन दिवस करण्याचं नियोजन केलं आहे.

आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, १ डिसेंबरच्या आवर्तनातून शहराचा साठवण तलाव भरला जाणार आहे. त्यानंतर काही काळ दररोज पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

नागरिकांसाठी टँकरची व्यवस्थाही केली जात आहे. या निर्णयामुळे श्रीरामपूरकरांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. तर मग मंडळी तुम्हाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा हा निर्णय कसा वाटला ? कमेंट करून नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button