
श्रीरामपूर आणि परिसरातील प्रवाशांनो, पुण्याला जाण्यासाठी आता बस बदलण्याची किंवा दुसऱ्या बसची वाट पाहण्याची गरज कमी होणार आहे. कारण तुमच्यासाठी नवीन थेट एसटी बससेवा सुरू झाली आहे. कशी आहे ही नवीन बससेवा? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, एसटी महामंडळाच्या वैजापूर आगाराकडून वैजापूर ते पुणे ही बस श्रीरामपूरमार्गे सुरू करण्यात आली आहे. आता या बसचं वेळापत्रक समजून घ्या. दररोज सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी बस वैजापूरहून निघेल.
हरेगाव, श्रीरामपूर, बेलापूर, देवळाली प्रवरा आणि राहुरीमार्गे पुण्याला पोहोचेल. तर पुण्याहून दुपारी ३ वाजता हीच बस वैजापूरसाठी परतीचा प्रवास सुरू करेल.
प्रवासी संघटनेच्या पाठपुराव्यानंतर ही सेवा सुरू झाली आहे. यामुळे विद्यार्थी, नोकरदार आणि ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. तर मग मंडळी, तुम्हाला ही बससेवा उपयोगी ठरणार का? कमेंट करून नक्की सांगा!





