Latest

‘उपोषणाने पाऊस पडत असेल तर बसा, होमहवनाने पाणी मिळत असेल तर हवन करा !’ डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपुरात टोला !

श्रीरामपूरच्या पाणीप्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनांवर सुजय विखे पाटील यांनी थेट भाष्य केलंय. त्यांच्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा होतेय. सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणालेत? सांगतो; पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मतदार संवाद कार्यक्रमात सुजय विखे बोलत होते.
ते म्हणाले, उपोषण करून पाऊस पडणार असेल तर उपोषण करा, भाषणाने पाऊस पडणार असेल तर भाषणं करा आणि होमहवनाने धरणाचे दरवाजे उघडणार असतील तर हवनही करा!

मात्र, त्यांच्या या टोलेबाजीसोबतच त्यांनी एक गंभीर इशाराही दिला. पाणीवाटपाचा निर्णय केवळ श्रीरामपूर शहराचा विचार करून घेता येणार नाही.

कारण एक चुकीचा निर्णय संपूर्ण तालुक्याला पुढील बारा महिने पाण्यापासून वंचित ठेवू शकतो. तर मग मंडळी, श्रीरामपूरच्या पाणीप्रश्नावर तोडगा कसा निघणार ? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button