
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. काय आहे नवीन अपडेट? सांगतो पण आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी, राहाता बाजार समितीमधून सोयाबीन उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
शनिवारी सोयाबीनला प्रतिक्विंटल ७ हजार ९० रुपये इतका कमाल भाव मिळाला. त्यामुळे बाजारातील सोयाबीनच्या दराकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
राहाता बाजार समितीत शनिवारी सोयाबीनची १५ क्विंटल आवक झाली. यामध्ये सोयाबीनला किमान ६ हजार ९०० रुपये, कमाल ७ हजार ९० रुपये, तर सरासरी ७ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
दुसरीकडे, गव्हाची बाजारात २ क्विंटल आवक झाली. गव्हाला किमान २ हजार ८०० रुपये, कमाल ३ हजार रुपये, तर सरासरी २ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
तसंच हरभरा डंकीला सरासरी ५ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. आता प्रश्न असा आहे की, सोयाबीनचे दर आगामी काही दिवसात आणखी वाढणार की स्थिर राहणार ? तुमच्या भागात सोयाबीनला किती भाव मिळतोय ? कमेंटमध्ये नक्की सांगा!





