
एकेकाळी नगरच्या राजकारणात ज्यांचा दबदबा होता, स्वतःची दोन हेलिकॉप्टर होती आणि राजकीय वर्तुळात मोठं नाव होतं… त्याच भानुदास कोतकर यांच आयुष्य मात्र कमालीचं वादग्रस्त राहिलं. नेमके कोण होते केडगावचे भानाभाऊ ? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो करायला विसरू नका.
मंडळी भानुदास कोतकर यांनी केडगावच्या मातीतून आणि सरपंच पदापासून राजकारणाला सुरुवात केली. पंचायत समितीचे सभापती, बाजार समितीचे अध्यक्ष ते काँग्रेसचे नेते, असा त्यांचा प्रवास झाला.
संदीप उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी नगर-पुणे महामार्गावर आलिशान हॉटेल्स उभारली. त्यांचा मुलगा संदीप नगरचा महापौर झाला, तर सून उपमहापौर बनली.
मात्र, २००८ मधील अशोक लांडे हत्या प्रकरणाने त्यांच्या आयुष्याला मोठं वळण दिलं. या प्रकरणात न्यायालयाने भानुदास कोतकर आणि त्यांच्या तिन्ही मुलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २०१८ मधील केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात सुद्धा त्यांच नाव आलं.
अलीकडेच त्यांच्या हॉटेल्सवर आणि घरावर आयकर विभागाची चौकशी झाली. दरम्यान, हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झालं. पण मंडळी तुम्हाला केडगावच्या भानाभाऊंबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.





