
पीएम किसान योजनेबाबत नवीन अपडेट हाती आली आहे. काय आहे नवी अपडेट? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबरला वितरित केला जाणार आहे.
मात्र, पैसे मिळवण्यासाठी काही गोष्टींची पूर्तता करणं महत्त्वाचं आहे. तुमची ई-केवायसी पूर्ण आहे का ? नसेल, तर ती तातडीने पूर्ण करून घ्या.
कारण ई-केवायसी अपूर्ण असल्यास हप्त्याचे पैसे अडकण्याची शक्यता आहे. याशिवाय, तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे का, जमिनीच्या नोंदींची पडताळणी पूर्ण झाली आहे का, हेही तपासून घ्या.
चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे पैसे मिळण्यास विलंब होऊ शकतो. तर मग मंडळी तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळतोय का ? कमेंटमध्ये नक्की सांगा.





