
गेल्या दीड महिन्यापासून ४० रुपये किलोच्या आसपास अडकलेल्या कांदा दरात अखेर वाढ झाली आहे. अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा कांदा बाजारभावाची 6000 रुपयांकडे वाटचाल सुरू झाली आहे. कांद्याला कुठे मिळतोय हायेस्ट भाव? जाणून घेऊया. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी पारनेर बाजार समितीत रविवार, २५ ऑक्टोबर रोजी झालेल्या लिलावात चांगल्या प्रतीच्या गावरान आणि लाल कांद्याला तब्बल ५३ ते ५५ रुपये किलो भाव मिळाला.
या लिलावात तब्बल १९ हजार ४५९ कांदा गोण्यांची आवक झाली. लाल कांद्याची आवक कमी झाली, तर आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि केरळमधून मागणी वाढल्याने दराला आधार मिळाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.
चांगल्या प्रतीच्या कांद्याला ५४ ते ५५ रुपये किलो, तर दुसऱ्या प्रतीच्या गावरान आणि लाल कांद्याला ५० ते ५२ रुपये किलो दर मिळाला. दरम्यान, शेतकऱ्यांनी कांदा बांधावरच विकण्याची घाई करू नये.
कांदा व्यवस्थित सुकवून, प्रतवारी करून बाजार समितीत आणावा, असं आवाहन करण्यात आलंय.,पण तुमच्या भागात कांद्याला सध्या किती भाव मिळतोय? कमेंटमध्ये नक्की सांगा.





