Latest

अहिल्यानगरच्या राजकारणावर काळाचा घाला ! 5 वर्षांत 5 मातब्बर नेत्यांचं निधन, नगर झालं सुन्न…

अहिल्यानगरच्या राजकारणात २०२० ते २०२६ या काळात पाच अनुभवी नेत्यांनी जगाचा निरोप घेतला… त्यांच्या जाण्याने शहराच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली !

२०२० मध्ये शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचं निधन झालं. त्यानंतर २०२१ मध्ये भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांनी जगाचा निरोप घेतला.

२०२५ मध्ये राष्ट्रवादीचे अरुणकाका जगताप यांचं २ मे रोजी निधन झालं. त्याच वर्षी १७ ऑक्टोबरला भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचंही निधन झालं. आता २०२६ मध्ये २४ ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचं निधन झालं. या पाचही नेत्यांची राजकीय कारकीर्द वेगवेगळी होती.

कुणी खासदार म्हणून काम केलं, कुणी अनेकदा आमदार झाले, तर कुणी शहराच्या आणि सहकार क्षेत्राच्या राजकारणात आपला ठसा उमटवला. आज नगरच्या राजकारणात नवी पिढी सक्रिय आहे.

मात्र, या ज्येष्ठ नेत्यांचा अनुभव, कार्यकर्त्यांशी असलेली नाळ आणि राजकीय वाटचालीतील योगदान यांची चर्चा आजही होते. तर मग मंडळी तुमच्या या पाच मातब्बर नेत्यांपैकी सर्वाधिक आवडता नेता कोणता? कमेंट मध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button